नागपूर :- महानगरपालिका लकडग्ंज झोन क्र. 08 अंतर्गत दि. 08/08/2026 रोजी महापौर म.न.पा. यांचे सभेमध्ये शहरातील अनधिकृत सुरु असलेले कारखाने, शॉपींग मॉल, व इमारती व इतर यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आज दि. 19/08/2026 रोजी प्रभाग क्र. 23 अंतर्गत मे. दुल्हेराजा एन. एक्स. प्रो. पोपटलाल नथ्थुलाल पटेल, सुफी होम हार्डवेअर मे. सुभाष हेमानी, मे. रोशन दिलीप मुनियार (रॉयल इनफिल्ड), सर्व राहणार छापरु नगर नागपूर. यांच्यावर विनापरवाना शॉपींग मॉल, चालविण्या प्रकरणी लकडगंज झोन क्र. 08 म.न.पा. नागपूर तर्फे नोटीस कार्यवाही करण्यात आली.
सर्दहु कार्यवाही झोनचे सहा. आयुक्त विजय थुल, उप अभियंता विजेन्द्र सहारे, अग्निशमन अधिकारी प्रकाश कावलकर, लकडगंज फायर स्टेशन, तसेच एन.डी. एस. पथक व इतर कर्मचारी हयांच्याव्दारे कार्यवाही करण्यात आली.





