spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागरिकांना सेवा पुरविण्यास तत्पर राहा – आयुक्त संदीप देशमुख

– राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांनी दिली भंडारा येथील ‘आपले सरकार’ केंद्राला भेट

हंसराज,भंडारा :- राज्य लोकसेवा हक्क आयुक्त (नागपूर विभाग) संदीप देशमुख यांनी नुकताच भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ‘समीर वर्ल्ड कॉम्प्युटर सेंटर’ या आपले सरकार केंद्राला भेट देऊन सेवांचा आढावा घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त संदीप देशमुख म्हणाले की, केंद्र संचालकांनी नागरिकांकडून जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज स्वीकारावेत आणि विहित कालमर्यादेत त्यांचा निपटारा करावा. सेवा वितरणामध्ये पारदर्शकता, तत्परता आणि सौजन्य राखावे. तसेच, शासनाने निश्चित केलेले दरच आकारले जावेत आणि केंद्रावर माहिती फलक व दरपत्रक लावणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांनी केंद्रावरील सुविधांची पाहणी करून केंद्र संचालक समीर नवाज यांचे अभिनंदन केले. ज्या सेवा सध्या ऑफलाईन आहेत, त्या लवकरच ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील कांबळे, महाआयटीचे जिल्हा समन्वयक चंचल मजुमदार, तहसीलदार संदीप माकोडे, केंद्रसंचालक समीर नवाज, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, कॉम्प्युटर ऑपरेटर विभांषू तिरपुडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.