नागपूर :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त बमलेश्वरी नगर, वांजरा, उत्तर नागपूर येथे रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करण्यासाठी या रॅलीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी आदर व्यक्त केला. त्यांच्या समतावादी आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेना विदर्भ सचिव राजेश डोंगरे, लहुजी शक्ती सेना नागपूर जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष नितीनजी वाघमारे, लहुजी शक्ती सेना नागपूर शहर अध्यक्ष रमेश पाडन तसेच सामाजिक कार्यकर्ते अजय इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीच्या आयोजनासाठी अजय शनेश्वर, राज डोंगरे, अंकुश वानखेडे, रोशन काळे, रुपेश खांडाळे, विवेक काळे, पृथ्वीराज डोंगरे, दिलीप काळे, रामकृष्ण वानखेडे, मीरा डोंगरे, नेहा काळे, नंदा काळे, लता शनेश्वर, विनोद गोरले, इंदु वानखेडे, पूजा डोंगरे, सपना डोंगरे, शारदा खंडाळे, प्रिया वानखेडे, अशोक खडसे, बबीता खडसे, वनिता इंगळे, निलेश वानखेडे आणि रेश्मा वानखेडे यांनी परिश्रम घेतले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी अण्णाभाऊंच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त वांजरा येथे भव्य रॅली









