spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

योग सखी बहुउद्देशीय संस्था तर्फे श्रावण सरी सोहळा साजरा

कन्हान :- योग सखी बहुउद्देशीय संस्था व योग सखी परिवार व्दारे श्रावण सरी सोहळा साजरा करण्यात आला.

श्रावण सरी सोहळ्यासाठी येस हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. ज्योती ढगे कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होत्या. डॉ. ज्योती ढगे आपल्या भाषणात म्हणाल्यात की महिलांनी अंध श्रद्धेच्या मानसिक गुलामीतुन बाहेर निघुन विज्ञानवाद व महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करावा. तसेच सावित्रीबाई फुले ह्यांच्या शैक्षणिक संघर्षावर प्रकाश टाकला. महिलांनी उखाणे, नक्कल, नृत्य विविध खेळ या माध्यमातुन आपल्यातील सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यात ८० महिलांनी सहभाग घेतला. इंडियन नेव्हीत क्लास वन ऑफिसर म्हणुन सिलेक्शन झालेल्या मोनाली लुचे चा सत्कार करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व इतर साहित्य वाटप करण्यात ज्या महिलांनी मोलाचे सहकार्य केले, त्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रियंका साठवणे हिने तर आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव छाया कुरुटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माधुरी लाडेकर, चंदा नरड, मेघा फेंडर, मनीषा बोरकर, सोनाली कडु, रेखा कन्नाके, गायत्री दरणे, शुभांगी भागवतकर, लता खांब लकर, श्वेता खाईवाले, सोनु खांबलकर, वनिता बिरम वार, किरण कडवे, प्रिया कडु, छाया वानखेडे, प्रज्ञा भगत, रूपा झिलपे ह्यांनी सहकार्य केले.

Popular Articles