spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांशी संवादातून विद्यार्थ्यांना मिळाले जीवनज्ञान 

किशोर साहू, मौदा :- आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या जीवनातील अनुभव जाणून घेतले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या शिक्षणाच्या काळातील परिस्थिती, शाळेचे स्वरूप, त्या वेळची जीवनशैली, संस्कृती व सामाजिक परिस्थिती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी रामकृष्ण तिजारे, मोडका ढेंगे, अनिता धांडे व बाळकृष्ण तिजारे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी अत्यंत आदराने व आपुलकीने प्रश्न विचारत ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव जाणून घेतले. त्यांच्या अनुभवातून पूर्वीची संस्कृती, परंपरा व जीवनपद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मौल्यवान माहिती मिळाली.

याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेचे महत्त्व’ तसेच ‘कोण बने स्मार्ट बॉय व गर्ल’ या उपक्रमांमध्येही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी केले. यावेळी सहाय्यक शिक्षक निलेश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व त्यांच्या अनुभवातून शिकण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आनंददायी शनिवारचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व संस्कारक्षम ठरला.

Popular Articles