कामठी :- कामठी तालुक्यातील घोरपड येथे मराठ वऱ्हाड दूध उत्पादक संस्था, नागपूर यांच्या माध्यमातून नवीन दुग्ध संकलन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, दूध वाहतुकीसाठी लागणारा वेळ व खर्चही कमी होणार आहे.
घोरपड येथे सुरू करण्यात आलेल्या या केंद्रावर परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून नियमितपणे दूध संकलित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांना नियमित व सुलभ पद्धतीने दूध विक्री करता यावी तसेच ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला अधिक बळकटी मिळावी, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असलेल्या दुग्ध व्यवसायासाठी स्थानिक पातळीवर संकलन केंद्र उपलब्ध झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या केंद्रामुळे परिसरातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास हातभार लागेल, .याप्रसंगी पावनगाव ग्रा प सरपंच रामचंद्र रेवडे,घोरपड ग्रा प सरपंच पविन कुतथे,मंगेश लांजेवार. दत्तू ठाकरे, निखिल खाडे, दिगांबर डोंगरे,दिनेश शहाणे, आदित्य खोत, सुरेंद्र धनजोडे, जितेंद्र पाली, महादेव कडू, बाल्या धरमारे, नरेन ठाकरे उपस्थित होते.








