नागपूर :- ढिवर समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाज भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. ढिवर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी समाज भवनाची आवश्यकता असून, समाजातील महिला व नागरिकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज भवन महत्त्वपूर्ण ठरेल, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वनिता नगरे यांनी नितीन गडकरी यांना निवेदन दिले. यावेळी रश्मि नान्हे, महानंदा शिवरकर, भारती नान्हे, पूजा नगरे, श्रुती कर्णेके, आणि मनोज नगरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.








