spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे विषय तज्ञांचे मार्गदर्शन व वृक्षारोपण

किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता.२४ ऑगस्ट) ला प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे “विषय तज्ञांचे मार्गदर्शन” या उपक्रमा अंतर्गत, विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आजनगाव येथील वैद्यकीय चमूस मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित केले होते.

या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती थुल, परिचारिका जी. ए. शहा , प्रांजना ढोबळे, कर्मचारी अक्षय वाडीभस्मे उपस्थित होते. मान्यवरांनी “आरोग्य व रोग” या विषयावर मार्गदर्शन केले. ज्याचा लाभ विद्यार्थ्यासह शाळेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा झाला.

वैद्यकीय चमूने, विषयावर मार्गदर्शनात, रोग कसे होतात व रोग होऊ नये यासाठी घ्यायची काळजी, पावसाळ्यातील रोग व आरोग्याची काळजी, स्वच्छतेचे महत्व पटवून दिले काही बाबी प्रात्यक्षिक करून दाखवल्या.

विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक संकल्पना अधिक प्रभावीपणे समजाव्या, सखोल ज्ञान वृध्दी व्हावी, हे धेय्य अनुसरून, प्रत्यक्षात तज्ञाकडून सखोल माहिती मिळावी ही बाब पुढे ठेवून, नियमितपणे विज्ञान शिक्षकांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विज्ञान शिक्षक गुणरत्न गजभिये यांनी उपस्थित पाहुण्यांना पुस्तक व वृक्ष भेट दिले.कार्यक्रमानंतर मान्यवराच्या हस्ते शालेय परीसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुरेश टांगले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक राजू गेडाम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लिपीक सुनील डोंगरे, मदतनीस मुंगाटे सह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.