spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सिहोरा पोलिसांचा ‘रूट मार्च’; शांततेचे आवाहन

हंसराज भंडारा सिहोरा :- आगामी गोकुळाष्टमी, पोळा, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सिहोरा पोलीस स्टेशनच्या वतीने आज, २५ ऑगस्ट रोजी शहरात ‘रूट मार्च’ काढण्यात आला. परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

दुपारी २ वाजता पोलीस स्टेशनपासून सुरू झालेला हा मार्च गुजरी चौक, जामा मशीद, सराफा लाईन, बाजार चौक, हनुमान मंदिर आणि गोबरवाही फाटा या प्रमुख मार्गांनी काढण्यात आला. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येणारे सर्व सण नागरिकांनी गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करावेत, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी यावेळी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.