spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रणाळा रोडवरील अपघातात जखमी रेल्वे कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रबुद्ध नगर येथील रहिवासी व रेल्वे विभागात कार्यरत कर्मचारी राकेश सवाईथुल (वय ५२) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी राकेश सवाईथुल हे रणाळा रोडवरून जात असताना एका दुचाकीचालकाने दिलेल्या धडकेत गँभिर अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.

राकेश सवाईथुल यांच्या निधनाची वार्ता समजताच प्रबुद्ध नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सवाईथुल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची नोंद नवीन कामठी पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठिमागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.