spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

व्यवसायिकाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चंद्रमनी बुद्ध विहार परिसर रहिवासी एका व्यवसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव प्रमोद रामटेके वय 55 वर्षे रा चंद्रमनी बुद्ध विहार जवळ कामठी असे आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली .घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.