spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साखरेचा कृत्रिम भाववाढीचा आरोप; धाडी टाकून साठे मुक्त करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

नागपूर :- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून साखरेचा अवैध साठा करून कृत्रिम भाववाढ केली जात असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केला आहे. अन्नधान्य पुरवठा व वितरण विभागाने तातडीने धाडी टाकून साखरेचे साठे मुक्त करावेत आणि भाववाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी जिल्हा व शहर कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी आणि जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे यांनी केली. सरकारी आकडेवारी नुसार २० जुलै रोजी, साखरेचा दर ४८.१८ रुपये किलो होता. तो २० ऑगस्टला ५५.७० तर २३ ऑगस्टला ६३.१२ रुपयांवर पोहोचला असून बाजारात साखर ७५ रुपये किलोपर्यंत विकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सणा सुदीच्या काळात दरवाढीचा हा प्रकार दरवर्षीच होत असल्याचा आरोपही करण्यात आला. साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. तसेच अन्नपुरवठा व वितरण विभागात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे, अनिरुद्ध गुप्ते, प्रकाश भुजाडे, समीर जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या असून असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी यांनी कळविले आहे.

Popular Articles