spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सक्करदरा येथील व्यापान्यांकडून रात्री ९ वाजेपर्यंत २७ लाखांचे धनादेश वसूल

– आज प्रल्हाद पडोळे यांच्या मिळकतीवर जप्ती व अटकावणी

– खरेदी-विक्रीवर कायदेशीर बंदी, भाडेकरू नसल्याचा दावा ठरला खोटा; पथकाच्या हाती लागले थेट ‘रेंट अॅग्रीमेंट’, मिळकतीवर लावले १०x४ फुटांचे जाहीर लिलावाचे फलक; २१ दिवसांत कर न भरल्यास थेट लिलाव.

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोन क्र. ५ अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा प्रशासनाने थडक कारवाईचा बडगा उगारला आहे. काल सक्करदरा परिसरातील व्यापान्यांवर करण्यात आलेल्या कारबाईनंतर रात्री ९ वाजेपर्यंत एकूण २७ लाख रुपयांचे धनादेश वसूल करण्यात आले. तर आज, दुसन्या दिवशीही मोहीम सुरू ठेवत तब्बल ५५ लाख रुपयांची थकबाकी असणा-या मोठ्या मिळकतीवर थेट जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात आली.

सक्करदरा :

काल (शुक्रवारी) सक्करदरा चौक परिसरातील ‘आयुर्वेदिक कॉलेज चिल्लर दुकानदार संघ’ येथील थकीत कर वसुलीसाठी मनपा पथकाने कारवाई केली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर संबंधित थकबाकीदारांनी कर भरण्यास सहमती दर्शविली व रात्री ९ वाजेपर्यंत मिळकतधारकांनी एकूण २७ लाख रुपयांचे धनादेश मनपाकडे सुपूर्द केले.

आजची मोठी जप्ती व अटकावणी कारवाई:

शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी नेहरूनगर झोन क्र. ५ च्या कर व कर आकारणी विभागामार्फत प्रल्हाद बाबुराव पडोळे यांच्या मिळकतीवर धडक कारवाई करण्यात आली:

प्रभाग/वॉर्ड क्र .: २०, मालमत्ता क्र .: १२८८/२५४, Index क्र .: २००८०१६, UPIN क्र .: ०२००२२०२२२

सदर मिळकतीवर रु. ५५.०० लक्ष व इतर शुल्क थकबाकी असल्याने आज प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मिळकतीमधील ५ ते ७ अलमान्या, एक सोफा संच तसेच इतर साहित्याची जप्ती करण्यात आली.

भाडेकरूंचा खोटा दावा उघडकीस; रेंट अॅग्रीमेंट सापडले:

मागील चार वर्षापासून मनपात्फे अनेकदा या मिळकतीचा ज़ाहीर लिलाव प्रसिद्ध करण्यात येत होता. मात्र, प्रत्येक वेळी मिळकतधारक काही ना काही कारणे पुढे करून लेखी निवेदने सादर करत असे आणि जाहीर लिलावाची प्रक्रिया धांबवण्याची विनंती करत असे. “माझ्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे भाडेकरू नाहीत”, असा बनाव तो सातत्याने करत होता. मात्र आज प्रत्यक्ष कारवाईदरम्यान मनपा पथकाच्या हाती तेथील भाडेकरूंचे थेट रेंट अॅग्रीमेंट (भाडे करारनामा) व संबंधित पुरावे लागले आहेत. यावरून नागपूर महानगरपालिकेने केलेली कर आकारणी ही पूर्णपणे योग्य व कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.

कारवाई टाळण्यासाठी आजारपणाचे नाटक; जागेवरून पलायन:

प्रत्येक वेळी मनपा पथक कारवाईसाठी पोहोचल्यावर मिळकतधारक मोक्यावर उपस्थित राहत नाही. “मी आजारी असून रुग्णालयात भरती आहे”, असे खोटे कारण सांगून तो प्रशासनाची दिशाभूल करतो. प्रत्यक्षात प्रकृती व्यवस्थित असतानाही तो केवळ कारवाई टाळण्यासाठी हजर राहत नाही आणि दूरवरूनच कारवाईवर लक्ष ठेवतो. आजही कारवाईदरम्यान तो स्वतः उपस्थित न राहता पळ काढत होता.

१० बाय ४ फुटांचे फलक लावून लिलावाचा इशारा: सदर मिळकतीवर विक्री, गहाण अथवा खरेदीबाबत कायदेशीर बंदी घालण्यात आली असून या संदर्भात कोणीही कोणताही आर्थिक अथवा मालमत्तेचा व्यवहार करू नये, अशी ताकीद मनपात्फे देण्यात आली आहे. मिळकतधारकाने २१ दिवसांच्या आत थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास सदर मिळकतीचा जाहीर लिलाव करण्यात येईल, अशा आशयाचे १० बाय ४ फुटांचे भव्य अधिकृत बॅनर मिळकतीच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे.

सदर कारवाई नेहरूनगर झोन क्र. ५ चे सहायक आयुक्त विकास रायबोले यांच्या मार्गदर्शनात व अधीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत कर निरीक्षक सचिन मेश्राम, किसन बारई, सुधीर बोरकर यांच्यासह झोनमधील इतर कर्मचारी उपस्थित होते. धकबाकीदारांनी कोणतीही सबब न सांगता आपला थकीत मालमत्ता कर त्वरित महापालिकेकडे जमा करावा, अन्यथा लिलावाची कायदेशीर प्रक्रिया विनाविलंब राबविली जाईल, असा सज्जड इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे

Popular Articles