यवतमाळ :- खरीप हंगाम सन २०२६-२७ या वर्षासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या तालुकानिहाय प्रस्तावांच्या आधारे जिल्ह्यातील एकूण २०५२ लागवडी योग्य गावांची नजर अंदाज पैसेवारी काढण्यात आली आहे.
प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील एकाही गावाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त नाही. २,०५२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून, यवतमाळ जिल्ह्याची एकूण नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे इतकी काढण्यात आली आहे.
त्यानुसार यवतमाळ तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३५ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, कळंब तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १४१ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, बाभूळगाव तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३३ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, आर्णी तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १०६ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, दारव्हा तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १५० गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, दिग्रस तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या ८२ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, नेर तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १२१ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे काढण्यात आली आहे.
पुसद तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १८७ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, उमरखेड तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३६ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, महागाव तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या ११२ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, केळापूर तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३० गावात नजर अंदाज पैसेवारी ४९ पैसे, घाटंजी तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १०७ गावात नजर अंदाज पैसेवारी ४७ पैसे, राळेगाव तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १३२ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, वणी तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १५५ गावात नजर अंदाज पैसेवारी ४८ पैसे, मारेगाव तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या १०८ गावात नजर अंदाज पैसेवारी ४६ पैसे, झरी जामणी तालुक्यातील लागवडी योग्य असलेल्या ११७ गावात नजर अंदाज पैसेवारी ४९ पैसे अशा एकूण २०५२ गावांमध्ये नजर अंदाज पैसेवारी ही ४७ पैसे काढण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदा (महसूल) यांनी दिली आहे.








