spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बंदर गावात भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप शिबीर

यवतमाळ :- राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पारधी बेडे, कोलाम पाडे, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या वस्त्यांमधील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत राळेगाव तालुक्यातील बंदर या गावात भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिराचे काल आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात गावातील नागरिकांना विविध योजनांची व प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली.

या शिबिराला मंडळ अधिकारी, तलाठी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Popular Articles