नागपूर :- हलबा समाज महासंघाची 51 वी वार्षिक आमसभा दिनांक 27 सप्टेंबर रोजी, महासंघाचे दिनदयाल नगर येथील सांस्कृतिक भवनात संपन्न झाली. या सभेत मोठ्या संख्येत पदाधिकारी सदस्य आमंत्रित नवनियुक्त नगरसेवक प्राविण्यप्राप्त विज्ञार्थी इत्यादि मान्यवरांची उपस्थिती होती.
आमसभेच्या निमित्यानी उपस्थित सर्व सदस्य पदाधिकारी आणि विज्ञार्थी करिता प्रारंभास महासंघातर्फे श्री श्री रविशंकर यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर तर्फे नवचेतना शिबिराचे आयोजन करून स्वस्थ मन शांत मन आनंदमय जीवन जगण्याकरीता ज्ञान- घ्यान- गान या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये तणावमुक्त जीवन आत्मविश्वास व सर्जनशिलता वाढविने मानसिक शांतता व एकाग्रता सुधारणे कौशल्य विकास तसेच निरोगी जीवनशैली या सारख्या विषयांवर मार्गदर्शक सर्वश्री कांचन हटवार सौरव आणि वरूण यांच्या व्दारे मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात उपस्थित सभासद व विज्ञार्थी मित्रांनी शिबिराचा लाभ घेतला. सर्वप्रथम महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. देवराम नंदनवार यांनी आमसभेला मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्य विज्ञार्थी विशेष प्राविण्यप्राप्त समाज बांधवाचे शब्दसुमनाने स्वागत केले व त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. आमसभेच्या कार्यपदधती अनुसार मागील 50 वी आमसभेच्या कार्य वृत्ताचे वाचन व त्यास स्विकृती प्रदान करण्यात आली. संस्थेचे महासचिव डॉ रमेश पराते याचे व्दारे अहवालाचे वाचन व वर्ष 2025-26 आर्थिक वर्षामधील जमा- खर्च खाते आय व व्यय खाते ताळेबंध विवरण व वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले. या आमसभेच्या निम्मीत्ताने मान्यवराचे सत्कार कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित असलेले सर्व नवनियुक्त नगरसेवक सर्वश्री प्रविण बरडे, कल्पक भनारकर दिलीप दिवे व निधी तेलघोटे इत्यादि व समाजातील विविध श्रेतातिल नैप्युण्य / प्राविण्यप्राप्त जसे आचार्यपद पीएचडी विशेष कामगिरी प्राप्त समाजबांधव विज्ञार्थी व वयाची 75 वर्षे पुर्ण झालेल्या महासंघाचे आजीवन सभासद इत्यादि मान्यवरांचे गौरव व सत्कार त्यांना शाल श्रीफळ व मानचिन्ह देवून करण्यात आले. महासंघाव्दारे प्रत्येक वर्षी अनुसार याहि वर्षी जाहिर केलेल्या व प्राप्त झालेल्या व महासंघाची शिष्यवृती समिती तर्फे मंजूर करण्यात आलेले अर्ज एकूण 222 दहावी बारावी व उच्च शिक्षणात प्राविण्यप्राप्त विज्ञार्थांना रोख पुरस्कार व शिष्यवृत्ती देण्यात आली जवळपास 8.5 लक्ष रूपये वितरीत करण्यात आली. आमसभेच्या अध्यक्षिय संबोधनात डॉ. देवराम नंदनवार यांनी वर्षभरात महासंघाव्दारे राबविलेले विविध उपक्रमाची माहिती दिली. मानवताची सेवा हिच जीवनाचे सर्वोत्तम कार्य आहे लक्षात घेवून खापा मोहाडी भंडारा इत्यादि विविध गावात निःशुल्क हेल्थ चेकअप व डोळे तपासनी आणि असंख्य चश्मा वितरण करण्यात आले व उन्हाळयात नागपूर शहरात विविध ठिकाणी पाणिपोई लावण्याची आलेली होती तसेच सभागृहाची सुसज्ज सुशोभनिय रूप महासंघाची निरंतर प्रगतिशिल कार्यवाहि व सर्व कार्यकारीणी चे अमुल्य सहयोग याची माहिती दिली व उपस्थिताचे अमुल्य सहकार्या करिता आभार व्यक्त केले. या कार्यकमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता महासंघाची कार्यकारिणी सदस्य सर्वश्री विश्वनाथ धकाते, वामन खापेकर, अशोक निमजे, हरीभाऊ वरूडकर, मनोज हेडाउ, लक्ष्मण मोहाडीकर, मगलमुर्ती सोनकुसरे, सुधाकर कुभारे, योगेश गोन्नाडे, पुरूषोत्तम कोहाडकर, देवेन्द्र बोकडे, संध्या पराते, रवि पराते, परमानंद पराते, चंद्रकांत वैध, शांताराम पौनिकर, विनायकराव परोते, प्रकाश पाठराबे, श्रीकृष्ण निपाणे, तुकाराम कोहाडे, व्यवस्थापक बालाजी गाठीबांधे आणि उषा राखडे इत्यादिनी सहकार्य केले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सल्लागार अनिल नंदनवार यांनी कळविले आहे.








