spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर येथे बायोमास बँक आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; २२८ ग्रामस्थांनी घेतला लाभ

किशोर साहू, मौदा :- शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेतीचा सर्वांगीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ‘बायोमास बँक’ (बायोफ्युएलसर्कल) आणि रोटरी क्लब नागपूर डाऊनटाऊन (District 3030) यांच्या संयुक्त विद्यमाने आज चाचेर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील शेतकरी कुटुंब, महिला आणि बालकांसह एकूण २२८ ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरवण्यात आले.

महिलांच्या आरोग्यासाठी विशेष कर्करोग तपासणी

या आरोग्य शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महिलांमधील वाढत्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer) प्रतिबंधासाठी विशेष तपासणी व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने महिलांची प्राथमिक लक्षणे ओळखून विशेष चाचण्या केल्या, तसेच उपस्थित महिलांना वैयक्तिक स्वच्छता व पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केले. तपासणीअंती गरजू रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

बायोमास बँकेचा नावीन्यपूर्ण उपक्रम: शेती कचऱ्यातून समृद्धी व पर्यावरण रक्षणशेतात पिकांच्या काढणीनंतर उरणारा काडीकचरा (बायोमास) शेतातच जाळण्याची पारंपरिक पद्धत जमिनीचा कस कमी करते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवते. यावर मात करण्यासाठी ‘बायोमास बँक’ आधुनिक यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने शेती अवशेषांचे संकलन (Biomass Aggregation) करून शेतकऱ्यांना थेट शेत-स्वच्छतेची मोफत सुविधा व अतिरिक्त उत्पन्नाचा शाश्वत मार्ग उपलब्ध करून देत आहे. ‘बायोमास बँक’ हे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे संचालित करते व शेतकरी त्यांच्या शेतातील सफाई व्हाट्स अप चॅट द्वारे (7387489490) बुक करू शकतात. ही संकलित जैवसामग्री हरित ऊर्जा आणि हरित इंधन साखळीमध्ये (Green Energy Value Chain) वापरली जात असल्याने प्रदूषणमुक्त भविष्यासाठी हा उपक्रम क्रांतीकारी ठरत आहे.

दर सहा महिन्यांनी शिबिर घेण्याची ग्रामस्थांची मागणी

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अशा सर्वसमावेशक आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे चाचेर आणि लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. गावात नियमित आरोग्य सेवेचा अभाव लक्षात घेता, बायोमास बँक व रोटरी क्लबने असे शिबिर दर सहा महिन्यांनी (अर्धवार्षिक) नियमितपणे आयोजित करावे, अशी आग्रही मागणी स्थानिक शेतकरी प्रतिनिधी व ग्रामस्थांनी केली.

याप्रसंगी बायोमास बँकेचे पुष्कर भोजराज जनरल मॅनेजर ,ऑपरेशन्स, स्मिता मुळमुळे एचआर मॅनेजर, रोटरी क्लब नागपूर, प्राजक्ता मंगरूळकर डाऊनटाऊनच्या अध्यक्ष, वीरेंद्र पत्रिकार माजी अध्यक्ष, विक्रांत दारवेकर सचिव, तपासणी पथकातील तज्ज्ञ डॉ. जीवक काकडे, डॉ. स्नेहल तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायत प्रतिनिधी सरपंच लुम्बिनी महेश कलारे, माजी सरपंच महेश गेंदलाल कलारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून शिबिराची यशस्वी सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.