कन्हान :- परशिवनी तहसील अंतर्गत असलेल्या महुली गावात लोधी, क्षत्रिय समाजाने गावकऱ्यांसोबत मोठ्या उत्साहात भुजलिया कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हनुमान मंदिरापासुन, राणी अवंतीबाई लोधी चौकात, संगीत आणि ‘आल्हाची भुजलिया लढाई, आल्हा खंडातील गाणी’ यांच्या साथीने, महिला, मुले, वडीलधारी मंडळी, तरुण यांच्यासह एकमेकांना भुजलिया, जवारे देऊन आशीर्वाद देण्याची परंपरा गावभर फिरून पेंच नदीत विसर्जन करण्यात आली. याप्रसंगी विशेषतः महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून भुजलि या कार्यक्रमाला एक विशेष आकर्षण बनवले. याप्रसं गी, मंगला कुसुंबे, कांचन लोधी, पल्लवी कुसुंबे, जया बिरोन, योगिता धुर्वे, करिश्मा खंगारे, चंपा पहाडे, मोना ली लोधी, नंदिनी कुसुंबे, लता कुसुंबे, विवेक क्षत्रिय यांच्यासह गावातील अनेक महिला आणि नागरिकांनी विशेष सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता टेकचंद कुसुंबे, नंदलाल कुसुंबे, लीलाधर भौंगा, भोजु बिरो, ज्ञानेश्वर लोधी, मुन्नाजी लोधी, बाळु कुसुंबे, सुनील मंगरूळकर, त्र्यंबक खंगारे, जितेंद्र कुसुंबे, नारायण लोधी आदीसह समाज बांधवांनी प्रयत्न केले.





