तीर्थक्षेत्र सासन रामापूर येथे श्रावण सोमवार निमित्ताने दोन दिवशीय आरोग्य शिबिर संपन्न

0
14

– पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डीडी, डीन, सीएस, डीएचओ यांच्या सहकार्याने महागड्या वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञांचा सल्ला व औषधोपचाराची होती सुविधा

सासन रामापूर प्रतिनिधी :- श्रावण सोमवार यात्रा महोत्सवानिमित्त शासनमान्य ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र श्री. भोगेश्वर महाराज संस्थान, सासन रामापूर येथे आयोजित दोन दिवसीय भव्य आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या, वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञांचा सल्ला व औषधोपचाराचा लाभ घेतला.

आमदार तथा विधानमंडळ आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा, खासदार व भाजपा नेत्या नवनीत रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून तसेच उमेश ढोणे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा व महागड्या वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देणे, हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीमुळे आवश्यक महागड्या चाचण्यांचाही नागरिकांना लाभ मिळाला.

शिबिरात अकोला येथील सु प्रसिद्ध ऑर्थोपडिक सर्जन डॉ तरुण राठी यांनी ही सेवा दिली व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश मात्रे, डॉ. संजय मरसाळे, डॉ. शिवफकक्षा खान, डॉ . निकिता डोणारकर, डॉ. तंनझीर अहमद, डॉ. राहुल उमप, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्व,डॉ. जय गावंडे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीचे वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले.

शिबिराच्या नियोजनात सीमा तायडे, टॉपनर्स, सीएनसीडी स्वाती पवार, अश्विनी जाधव, माधुरी तायडे (समुपदेशन), विभागीय व्यवस्थापक रूपाली ठाकरे (अमरावती), ऋतुजा सोनारी (औषध निर्माण अधिकारी), राजेंद्र गावंडे (एमपीडब्ल्यू), अनिल डोंगरे (एमपीडब्ल्यू) यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या उपक्रमासाठी उपसंचालक डॉ. वाकचौरे अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. राऊत, सिव्हिल सर्जन डॉ. विनोद पवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, आदींचे सहकार्य ,मार्गदर्शन लाभले.

शिबिराच्या आयोजनासाठी शासन मान्य क वर्ग तीर्थक्षेत्र श्री.भोगेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय काळे, सचिव शहादेव मेहरे, समन्वयक उमेश ढोणे,सरपंच, प्रशासक प्रा. विनोद सोनवणे, उपसरपंच रविंद्र पाचपोहे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्थानचे ट्रस्टी, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

तसेच अमोल कोरडे, गोपाळराव ढोणे, गजानन वानखडे, राहुल सोनवणे, आकाश सोनवणे, शुभम ढोणे, विकी गुरव, आकाश नांदुरकर, यश शामतमकर, पप्पू शांमतकर, देवीनंद जावरकर, वैभव जावरकर, दिनेश गिरे, रुपेश काळे, गजानन सोळंके, सुरेश सुभाष सोळंके, निवृत्ती ढोणे, मंगेश पुरी, मोहित चौबे, अमोल काळबांडे, अमर घाटे आदींनी शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या संदेशातून आयोजित या शिबिरात पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्थानचे पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.