spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुंभारे कॉलोनीतील घरफोडीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलनीतील एका घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंसह ३ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान केलेल्या घरफोडीचा नवीन कामठी पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या मुद्देमालापैकी ५७ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी आशीष मनोहर मेश्राम (३२) व बादल रवि नगरारे (२८) दोन्ही राहणार कामठी यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारे कॉलोनी, कामठी येथील फिर्यादी आकाश अशोक जगनीत (३४) यांच्या घरात १८ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत तब्बल ३ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासातून आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यासोबतच तांत्रिक यंत्रणेच्या माध्यमातून संशयितांचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आशीष मनोहर मेश्राम (३२, रा. कुंभारे कॉलनी, कामठी; मूळ रा. बिलासपूर, छत्तीसगड) याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे बादल रवि नगरारे (२८, रा. कुंभारे कॉलोनी, कामठी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालापैकी ५७ हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमालाबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई परिमंडळ क्र. ६ चे पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ व सहायक पोलिस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश नाटे, पोलिस उपनिरीक्षक अक्षय झगडे तसेच पोलिस कर्मचारी किशोर महंत, विवेक दौरसतेवार, सूरज ठाकूर, आशीष बागडे व तुषार मोरे यांनी केली तर यातील फिर्यादी आकाश जगणित ने पोलिसांनी केलेल्या कारवाई चे कौतुक करीत तपासात काम केलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे सह समस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.