spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे वाटप

– पेट मुक्तापूर येथे भाजप व युवा मोर्चाचा सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य

मेंढला प्रतिनिधी :- काटोल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जलालखेडा मंडळ तसेच भाजपा युवा मोर्चा नागपूर ग्रामीण (काटोल) यांच्या वतीने पेट मुक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बुक तसेच फळांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आल्याने या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय साहित्य आणि फळे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्यास त्याचा त्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर सकारात्मक परिणाम होतो, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी भाजपा युवा मोर्चा नागपूर ग्रामीण (काटोल)चे सचिव तुषारजी राऊत, जलालखेडा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण कुमारिया, युवा मोर्चा जलालखेडा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर, गाव अध्यक्ष सुजल वानोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत खाडे, गुड्डू शेंडे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भागवत, बोरकर, शेळके, केदार, अंगणवाडी सेविका वानोडे, वनिता मोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने निर्माण झाला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.