spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगरसेवक शैलेश पांडे यांनी हट्ट धरला रस्त्यासाठी

– नागपूर सुधार प्रन्यासच्या धोरणाविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात

– नर्मदा नगर एकता सोसायटी चा रस्ता चोरी गेल्याचा आरोप – शैलेश पांडे

गोधनी ते गोरेवाडा परिसरातील नागरिकांचे प्रश्न आणि त्या भागातील मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी नगरसेवक शैलेश पांडे यांनी नागपूर सुधार प्रन्यास प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषणच्या लढाईला सुरुवात केली आहे.

7 सप्टेंबर म्हणजे सोमवारपासून नगरसेवक शैलेश पांडे हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहे. गोधनी ते गोरेवाडा मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी व मंजूर ले आउट मधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहे. तसेच गोधनी ते गोरेवाडा टॉवर रोडचे मुख्य मार्गाचे जवळपास काम पूर्ण झाले असून हेरिटेज स्कूल जवळून उद्यान नगराकडे जाणारा केवळ सातशे ते आठसे मीटरचा तुकडा अद्याप अपूर्ण आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना थेट आणि सुरक्षित प्रवास करता येईल तसेच वेळ व इंधनाची मोठी बचत होईल. या भागातील वेगाने वाढणारी लोकसंख्या पाहता रस्त्याचा प्रश्न तात्काळ न सुटल्यास येत्या काळात पायी चालणे ही कठीण होईल. असा इशारा यावेळी नागरिकांनी दिलेला आहे तरी सुधार प्रन्यास ने यावर ताबडतोब पाऊल उचलावे व नागरिकांना न्याय द्यावा. नर्मदा नगर एकता सोसायटीमध्ये तीस फुटाचा रस्ता चोरीला गेला असं सुद्धा त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासवर आरोप लावलेला आहे. या सर्वांची उत्तरे एनटीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणी येऊन द्यावी. अशी सुद्धा त्यांनी आपल्या स्पष्ट शब्दात सांगितले आहे. उपोषणनाला बसलेले नागरिक व नगरसेवकांच्या सर्व प्रकारच्या मागण्या मान्य करावेच लागेल अन्यथा बेमुदत उपोषण सुरूच राहील. असा इशारा दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.