spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

मुंबई :- महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त वर्षा लड्डा, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त माधवी सरदेशमुख उपस्थित राहणार आहेत.

९ वा राष्ट्रीय पोषण माह २०२६, ‘माझी अंगणवाडी माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. पोषण अभियानांतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येतो. गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुले-मुली आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये पोषण, आरोग्य व संगोपनासंदर्भात व्यापक सहभागातून सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा पोषण माह साजरा केला जातो.

यंदाचा पोषण माह हा पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध अन्नगटांचा समावेश आणि स्थानिक अन्नपदार्थांवर भर देऊन आहारातील विविधतेस प्रोत्साहन देणे. नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि एसएनपी मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणासाठी समुदायाची मालकी व उत्तरदायित्व बळकट करणे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षणामध्ये ईसीसीई संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे मूलभूत घटक म्हणून प्रोत्साहित करणे तसेच बालक काय खाते आणि कसे शिकते यामधील अविभाज्य संबंध अधोरेखित करणे. याचबरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या भारतातील प्रमुख मातृत्व लाभ योजनेची १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मातृ पोषण, आरोग्यविषयक सकारात्मक सवयी, गर्भावस्थेदरम्यान आर्थिक सहाय्य आणि जीवनातील पहिल्या १००० दिवसांतील मातृ पोषण व संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करण्यावर या पोषण माहमध्ये भर देण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.