spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गट-क परीक्षा पुढे ढकलली

मुंबई :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर जुन्याच पद्धतीने आयोजित केली जाणार आहे.

परीक्षेचे नियोजन शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावे यासाठी विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांची उपलब्धता, सणासुदीचा काळ, वाहतुकीच्या अडचणी, तसेच राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ चे नियोजन आणि राज्य शासनाचे आगामी हिवाळी अधिवेशन या कारणांचा समावेश आहे.

दरम्यान, या परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राबाबतची विस्तृत माहिती MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळेत प्रसिद्ध केली जाईल. सर्व परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) नियमित भेट द्यावी, असे आवाहन MPSC द्वारे करण्यात आले आहे.

परीक्षेचे नवे वेळापत्रक

जाहिरात क्रमांक: 017/2026 (दिनांक 25 जून 2026)

जुनी तारीख: 25 ऑक्टोबर 2026

नवी सुधारित तारीख: 03 जानेवारी 2027

यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती, परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर जुन्याच पद्धतीने पार पडेल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.