spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील प्रमुख गणेश मंडळांना ‘आपली बस’ची सुलभ व सक्षम वाहतूक सुविधा

नागपूर :- शहरात गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली असून, गणेशभक्तांना प्रमुख गणेश मंडळांना सुरक्षित, सोयीस्कर व वेळेवर पोहचून “श्री गणेशाचे दर्शन” घेता यावे यासाठी ‘आपली बस’ सेवेमार्फत शहरातील विविध प्रमुख भागांमध्ये प्रभावी सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता विविध मार्गांवर ५ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंतच्या वारंवारतेने बस सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना प्रवासासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार असून, खासगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही मदत होणार आहे.

प्रमुख गणेश मंडळांना ‘आपली बस’ची कनेक्टिव्हिटी

‘आपली बस’च्या माध्यमातून अजनी चौक, बजाज नगर, भांडे प्लॉट, भांडेवाडी लेआउट, सेंट्रल अव्हेन्यू, धरमपेठ, गजानन नगर/वर्धा रोड, गांधीबाग, गोकुळपेठ, आय.टी. पार्क, इतवारी, जरीपटका, कुकरेजा नगर, लकडगंज, मंगळवारी, महाल, नंदनवन, प्रसाद नगर, प्रतापनगर, सदर व त्रिमूर्ती नगर या प्रमुख परिसरातील गणेश मंडळांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रमुख गणेश मंडळे

‘आपली बस’च्या माध्यमातून खालील प्रमुख गणेश मंडळांना सोयीस्कर कनेक्टिव्हिटी जवळील बस थांब्यावर उपलब्ध आहे:

महालचा राजा

दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ

मन्नतपूर्ती गणेश – भारत क्रीडा मंडळ

प्रतापनगरचा महागणपती

मानाचा राजा

प्रतापनगर बाल गणेश उत्सव मंडळ

धरमपेठ गणेश मंडळ

धरमपेठचा राजा

श्री गणेश उत्सव मंडळ, गल्ली क्र. ४

श्री प्रगती बाल गणेश उत्सव मंडळ

सदरचा महागणपती

इतवारीचा महाराज / श्री शक्ती गणेश उत्सव मंडळ

इतवारी बाल गणेश उत्सव मंडळ

गांधीबाग गणेश मंडळ

श्री एकता गणेश उत्सव मंडळ

शांतीचा गणपती

लकडगंज सार्वजनिक गणेशोत्सव

बाल गणेश उत्सव मंडळ

सेव्हन स्टार गणेश उत्सव मंडळ

व्ही.आय.पी.एल.चा राजा

आदियोगी थीम गणपती

महाकुंभ थीम गणपती

जगन्नाथ थीम – भारत क्रीडा मंडळ

डिस्नेलँड थीम गणपती

गजानन नगर गणेश मंडप

किंग काँग थीम गणपती

नवचेतना गणेश उत्सव मंडळ

शिवशंभू गणेश उत्सव मंडळ

श्री शिवराय गणेश उत्सव मंडळ

युवा गणेश उत्सव मंडळ

के.के. नगर गणेश उत्सव मंडळ

बजरंग गणेश उत्सव मंडळ

सुरक्षित, सोयीस्कर आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासासाठी आवाहन

गणेशोत्सवाच्या गर्दीच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित, सुलभ व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गणेशभक्तांनी गणेश मंडळांना भेट देताना शक्यतो ‘आपली बस’चा वापर करावा, तसेच अनावश्यक खासगी वाहनांचा वापर टाळून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ही विशेष वाहतूक व्यवस्था मा. परिवहन सभापती सौ. मंगला खेकरे व मा. आयुक्त, म.न.पा. डॉ. विपीन इटणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या विशेष उपक्रमाचा उद्देश आहे.

‘आपली बस’चे नागरिकांना आवाहन

“गणेशोत्सवाचा आनंद घ्या, वाहतूक कोंडी टाळा आणि सुरक्षित प्रवासासाठी ‘आपली बस’चा वापर करा!”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.