spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेश नगर कन्हान येथे तान्हा पोळा थाटात संपन्न

कन्हान :- छोटया छोटया लहानश्या मुलांचा तान्हा पोळा गणेश नगर कन्हान येथे उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे शुक्रवार (दि. ११) सप्टेंबर २०२६ ला सायंकाळी ५.३० वाजता गणेश नगर कन्हान येथे तोरणात छोटया छोटया लहानश्या मुलांनी अति सुंदर वेशभुषा परिधान करून छोटाशा लाकडी नंदीबैल सजवुन आणुन रांगेत उभे राहिल्यावर जेष्ट नागरिक मोरेश्वर अनकर यांच्या हस्ते सर्व नंदीबैलाची पुजा करून ” पंचमुखी गौरा पारबती हरबोला हरहर महादेव ” च्या जय घोषात सर्व छोटया मुलांना पेन्सील, रबर, शॉपनर, चॉकलेट सह इतर वस्तु भेट देण्यात आल्या तदंतर सर्व उपस्थित मुले, मुली, महिला व पुरूषाना प्रसाद वाटप करून ” एक नमन गौरा पारबती, हर बोला हरहर महादेव ” च्या गर्जेनेत तोरण तोडुन तान्हा पोळा फोडण्यात आला. याप्रसंगी मोरेश्वर अनकर, वसं तराव इंगोले, यशवंत निर्वाण, नथ्थुजी पाजुर्णे, भुषणरा व निंबाळकर, बबनराव इंगोले, रामभाऊ आग्रे, माधव काठोके, मोतीराम रहाटे, गितेश मोहणे, अशोक बारा पात्रे, कैलाश महाले, रंजित पाजुर्णे, हरिश अनकर, प्रफुल पाजुर्णे, राहुल निर्वाण, आतिश इंगोले, रोहित नाटकर, वैभव खैरकर, ओम अनकर, उत्कर्ष रहाटे, सुमित खैरकर, चित्रांश पाजुर्णे, उत्कर्ष मांढारे सह बहु संख्येने नगरातील महिला, पुरूषाच्या उपस्थित तान्हा पोळा उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.