spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दुधाळा येथे बैलपोळ्याची परंपरा ओसरतेय ! 

किशोर साहू, मौदा :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या दुधाळा येथे गुरुवार (ता. 10 सप्टेंबर)ला बैलपोळा शांततेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक सह शेतकरी वर्ग उपस्थित होते.

यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, एकेकाळी गजबजणारा बैलपोळा आता गावात, तालुक्यात ,जिल्ह्यात ,राज्यात व देशात मोजक्याच बैलांपुरता मर्यादित होताना दिसत असल्याची प्रतिक्रिया दुधाळा येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरी कडू यांनी याप्रसंगी दिली. काही गावांमध्ये बैलपोळा भरविण्यासाठी बैलच नसल्याने आता ट्रॅक्टरच्या पोळा भरविण्यात येत असल्याच्या बातम्या विविध हिंदी व मराठी दैनिकांमध्ये प्रकाशित होत असताना दिसत आहे, हे विशेष!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.