spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हरविलेली वाट सापडली… नेपाळी नागरिक पुन्हा आपल्या माणसांच्या कुशीत… नेपाळी नागरिक पुन्हा आपल्या माणसांच्या कुशीत

नागपूर :- मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत नागपुरात आढळलेल्या ४१ वर्षीय नेपाळी नागरिक खडका बहादूर दर्जी यांचे तब्बल महिनाभरानंतर कुटुंबीयांशी भावुक पुनर्मिलन झाले. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित आस्था पुनर्वसन निवारागृहाच्या संवेदनशील आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. रोजगाराच्या शोधात भारतात आलेले दर्जी हे रेल्वे प्रवासादरम्यान नागपुरात आले होते. १२ ऑगस्ट रोजी धंतोली पोलिसांच्या माध्यमातून त्यांना आस्था निवारागृहात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या निवासासोबत वैद्यकीय उपचार, समुपदेशन व पुनर्वसनाची काळजी घेत त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू करण्यात आला. या शोधमोहीमेत माणकामना एकता फाउंडेशन, ठाणेचे अध्यक्ष व मुख्य सल्लागार शालिग्राम तिवारी, तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सोशल सर्व्हिस सुपरिंटेंडंट कुंदा काटेखाये बिडकर यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. आस्था निवारागृहाचे सोशल वर्कर तुषार आर. हुकरे यांनी सातत्याने पाठपुरावा व समन्वय साधला. संचालक देवेंद्र क्षीरसागर, प्रोजेक्ट डायरेक्टर दीपक पसारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गौतम नागरे, समुपदेशक वैभव बागडे, संजना मडकाम, डॉ. अमिषा, काळजीवाहक अनंता नागोसे, कार्तिक कोडवते, परिचारिका योगिता भुमरकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून अखेर १३ सप्टेंबर रोजी दर्जी यांची कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्यात आली. महिनाभरानंतर आपल्या माणसांना समोर पाहण्याचा हा क्षण अत्यंत भावुक ठरला. या पुनर्मिलनातून “माणुसकीला सीमा नसतात” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.