spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आंबेडकर नगर परिसर रहिवासी एका विवाहित तरुणाने राहत्या घरातील घरमंडळी गाढ झोपेत असल्याचे संधी साधून राहत्या घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव रोहित उर्फ गोलू बुधाजी गजभिये वय 30 वर्षे रा आंबेडकर नगर कामठी असे आहे.आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून राहत्या घरात पत्नी व दोन मुलासह वास्तव्यास होता.गतरात्री अज्ञात कारणाचे निमित्त साधून घरातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना घडल्याने मृतक कुटुंबासह परिसरात एकच धक्का बसून चर्चेचा विषय ठरला.मात्र आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलवून शवविच्छेदन करण्यात आले व समस्त शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत आजनी रोड वरील मोक्षधाम येथे मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाच्या पाठिमागे कुटुंबात आई,वडील, दोन भाऊ,पत्नी व दोन मुलं असा आप्तपरिवार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.