spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वर्धा नदीच्या काठाची पाहणी

– सणा सुधीच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता 

मोवाड  :- स्थानिक मोवाड शहरातील वर्धा नदीच्या काठाची पाहणी नगरसेवक ललित खंडेलवाल व नगरसेवक अंकुश घावडे यांनी केली. यावेळी वर्धा नदी वर हरितालिका , ऋषिपंचमी व गणेश विसर्जन निमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाहणी केली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असते. त्यामुळे नदीकाठावरील स्वच्छता व लाईट ची व्यवस्था करण्यात यावी. याबाबत प्रशासनाला सक्त आदेश दिले. मोवाड येथे विशेष म्हणजे ऋषिपंचमी च्या दिवशी हजारो भाविक भक्त वर्धा आणि कोल्हार च्या संगमावर अंघोळी साठी येतात व ऋषी ची पूजा करतात विशेष म्हणजे याचभागाला लागून महादेवाचे मंदिर आहे. आणि ऋषिपंचमी च्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही व सोई सुविधा उपलब्ध राहील या बाबत संपूर्ण भागाची पाहणी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.