spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत वाढली

कामठी :- गणरायाच्या आगमनाने कामठी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कामठीचा विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गणराया आगमन सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडला. यावेळी गणरायाचे विधिवत पूजन करून शहरातील नागरिकांच्या सुख, शांती, उत्तम आरोग्य, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते बलविंदर सूरी, निर्मल सोनी तसेच ‘डॉ. हाथी’ या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते कवी कुमार आझाद यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत वाढली. कलाकारांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी भाजप शहराध्यक्ष मंगेश यादव, नगरसेवक ईशांत ठाकूर, योगेश गायधने, विवेक मंगतानी, कपिल गायधने, विजय कोंडुलवार, कमलकिशोर यादव, अथर्व पिंगळे, नरेश कलसे, राजेश खंडेलवाल, रामजी शर्मा, आशू अवस्थी, डॉ. महेश महाजन, अंश खंडेलवाल, सुदीप अग्रवाल, शुभम सराफ, पीयूष झमतानी, राहुल अग्रवाल, रजत शर्मा, कार्तिक कुशवाह, किशन शर्मा, संदीप अग्रवाल, ऋषी खेतान, राहुल गुरव, लालू सोलंकी व अभिलाष यादव यांच्यासह अन्य मान्यवर नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.