कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा वाजत गाजत श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२६ ला कामठीच्या राजाचे आगमन झाले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, संस्थेचे कार्यकारी संचालक अनुराग भोयर यांच्या उपस्थितीत कामठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी विधिवत पूजा करून गणेश मूर्तीची स्थापना केली.





