spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडा शहरात श्रींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग

– शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे चुरी डस्ट टाकून बुजविले

पांढरकवडा :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था अखेर नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांमध्ये चुरी डस्ट टाकून ते बुजविण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची तसेच गणेश मंडळांच्या मिरवणुकीची वर्दळ वाढते. मात्र, अनेक प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेश आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांमध्ये चुरी डस्ट टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचा प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केवळ उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती डागडुजी न करता शहरातील प्रमुख रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची स्थिती पुन्हा खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.