spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-2026” अंतर्गत एकुण आठ ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय ‍ रोजगार मेळाव्यांचे आयोजन 

गडचिरोली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून, त्यांनी सदैव जपलेल्या “ युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती ” या संकल्पनेला अनूसरून या विभागामार्फत एक महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतले आहे. मंगळवार दिनांक. 29 सप्टेंबर 2026 रोजी संपुर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी 500 ठिकाणी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-2026” अंतर्गत रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यांत येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील प्रत्‍येक जिल्हा,तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यांत येत आहे.

त्यानुषंगाने गडचिरोली जिल्हयामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली, यांच्या वतीने 1) शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली 2) महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमोरी, 3) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) वडसा, 4) शहीद बिरसामुंडा महाविद्यालय, कोरची 5) शिवाजी ज्युनिअर कॉलेज ,चामोर्शी, 6) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) आलापल्ली, 7) भगवंतराव आटर्स ॲण्ड सायन्स कॉलेज , एटापल्ली 8) श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, धानोरा या सर्व तालुक्यामध्ये मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी एकाच दिवशी वेळ सकाळी 10.00 वाजता पासून वरील एकुण आठ ‍ठिकाणी रोजगार मेळावे अथवा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यांत येत आहे.

वरील आठ ‍रोजगार मेळाव्या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या/उद्योजक विविध रिक्त जागांसह उपस्थित राहणार आहेत. याकरीता कमाल वय 16 ते ‍किमान 50 वयोगटातील, 12 वी पास / नापास , आयटीआय पास, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण अशा सर्व बेरोजगार व इच्छुक उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदविण्याकरीता खालील गुगल लिंकचा वापर करून गुगल फार्म ( Google Form ) भरणे अनिवार्य आहे.

त्यानंतर मंगळवार, दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय ‍रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी आपल्या बायोडाटा /‍रिज्युम व सर्व आवश्यक कागदपत्रासोबत वरील नजीकच्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार मेळाव्याच्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केली आहे. अधिक माहिती 7843048249 / 8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता गुगल फॉर्म लिंक व QR Code पुढीलप्रमाणे आहे. https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 वhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdlx3QsewUxOLBN4R71tm8jSs35YKqGGwtG5LzhKrsJLmLeow/viewform?usp=header


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.