spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भरधाव इनोव्हा ने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७४ वर्षीय वृद्धाला चिरडले; आरोपी चालकाला न्यायालयाकडून जामीन

नागपूर :- भरधाव वेगाने वाहन चालविताना नियंत्रण सुटून मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७४ वर्षीय वृद्धाला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी वाहन चालकास जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर यांनी जामीन मंजूर केला. ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे जपानी गार्डन परिसरात घडली. मृत व्यक्तीचे नाव कैलाश सौंधिया असे आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी जपानी गार्डनच्या बाजूने आलेली टोयोटा इनोव्हा SUV भरधाव वेगाने येऊन नियंत्रणाबाहेर गेली आणि फुटपाथवर धडकली. या अपघातात कैलाश सौंधिया यांना वाहनाची जोरदार धडक बसली. गंभीर दुखापतींमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी वाहनचालक तुषार काकडे याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी, FIR क्रमांक ६२१/२०२६ दाखल केला. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ व २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या वतीने अँड. भावेश सुगंध आणि अड. यश ज्ञानचंदानी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात बाजू मांडली. आरोपी मद्याच्या प्रभावाखाली होता किंवा नाही, याची तपासणी व त्यासंदर्भातील पुरावे खटल्याच्या सुनावणीदरम्यान तपासले जाऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, प्रकरणातील तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपीकडून आणखी कोणतीही महत्त्वाची वस्तू अथवा पुरावा जप्त करणे बाकी नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीचा मृत व्यक्तीला ठार मारण्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही बचाव पक्षाच्या वकिलांनी नमूद केले. या आधारावर आरोपी तुषार काकडे याला जामीन मंजूर करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. आणि जामिन मंजूर सुद्धा झालेला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.