spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले पुण्यातील कसबा, दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन 

– पुण्यातील गणेशोत्सवात केली देशातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी पुण्यातील कसबा गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नबीन यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर मंजुषा नागपुरे, आ. हेमंत रासने, पुणे महानगर अध्यक्ष धीरज घाटे आदी नेते उपस्थित होते.

सायंकाळी पुणे विमानतळावर नितीन नबीन यांचे आगमन होण्याआधी शेकडो भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. पुण्यात आगमन झाल्यावर नितीन नबीन यांनी सर्वप्रथम कसबा पेठेतील मानाच्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देत गणरायाची पूजा करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी सदाशिव पेठेतील साने गुरुजी तरुण मित्र मंडळ आणि कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणरायांचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नितीन नबीन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.