मुंबई :- उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅङ आशिष शेलार यांनी देखील यावेळी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पोलीस महासंचालक सदानंद दाते, सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा तसेच सचिव व प्रमुख शिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.





