spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कारवाई फ्लिपकार्ट ऑफिसमधून टीव्ही चोरणारे तीन डिलिव्हरी बॉईज अटकेत

नागपूर ११  :  फ्लिपकार्टच्या कार्यालयातून महागडे टीव्ही चोरी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन डिलिव्हरी बॉईजना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २,१७,३१४ किमतीचे चार महागडे टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. तक्रारदार रजत सुदाम चौधरी (३० वर्षे), मुंडा, कामठी येथील महादुर्गा मंदिराजवळ राहणारे, इन्सुरटेक सर्व्हिसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कार्यालय एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील सी-१६/१७, फ्लिपकार्ट ऑफिसमध्ये आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्टॉक तपासणीदरम्यान त्यांनी चार टीव्ही गायब असल्याचे आढळून आले. या टीव्हींची एकूण किंमत सुमारे ₹२.१७ लाख होती. संशयाच्या आधारे, कंपनीत डिलिव्हरी बॉईज म्हणून कार्यरत असलेल्या आशिष कोंडेकर, आकाश गिरे आणि राहुल बांते यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले चारही टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत असून, या चोरी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे आणि जलद प्रतिसादाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Popular Articles