spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉक्टर कुटुंबावर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल  वैद्यकीय वर्तुळात खळबळ

नागपूर ११ :  शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठा असलेल्या डॉक्टर कुटुंबावर हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात डॉ. यशस्वीता आंबेडकर (५८), डॉ. यशवंत आंबेडकर (६०) आणि डॉ. सुयश आंबेडकर (३२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही धंतोलीतील माईल स्टोन पार्क, धंतोली गार्डन परिसरात राहतात. तक्रारदार डॉ. मेघा, या स्वतः वैद्यकीय व्यवसायात असून त्यांचा विवाह १३ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. सुयश आंबेडकर यांच्याशी रीतसर नोंदणीकृत पद्धतीने झाला होता. मेघाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर लगेचच तिच्यावर नोकरी करण्याचा आणि माहेरून गाडी आणण्याचा दबाव टाकण्यात आला. तिच्या वडिलांनी सुयशसाठी गाडी खरेदी केली, पण ती गाडी त्याच्या नावावर का नोंदवली नाही, यावरून वाद निर्माण झाला. यानंतर सुयशने मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला. मेघाच्या वडिलांनी समेट करण्याचा प्रयत्न करताना डॉ. यशवंत आंबेडकर यांच्याशी संवाद साधला, परंतु त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. सासू डॉ. यशस्वीता यांनी मेघावर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आणि तिच्यावर खोटे आरोपही केले. या सर्व प्रकारांनी त्रस्त झालेल्या डॉ. मेघाने धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला प्रकरण ‘भरोसा सेल’कडे सोपवण्यात आले, परंतु तिथे तोडगा न निघाल्याने अखेर पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध ४९८ या  अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे नागपूरच्या वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे, कारण आरोपी कुटुंब शहरातील नावाजलेल्या डॉक्टरांमध्ये समाविष्ट आहे. धंतोली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Popular Articles