spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

खापा, ११ :  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे शनिवार ९ ऑगस्ट रोजी जिजामाता हायस्कूल चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तहसील अध्यक्ष विकल नवरे, खापा शहर अध्यक्ष राजा धुर्वे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रमुख वक्त्यांनी जागतिक आदिवासी दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेकरिता कपिल देशमुख, राहुल आष्टणकर, मुकेश पावडे, आशिष कुमरे, रवी परतेती, विजय धुर्वे, खेमराज बारापात्रे यांनी प्रयत्न केले. शेकडो नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला

Popular Articles