spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावा

ही परंपरा अविरत सुरु ठेवावी, माजी नगरसेविका, माजी शिक्षण सभापती हिराताई आष्टनकर यांची मागणी

खापा, ११ :  मानवी जीवनात एकदा राष्ट्रध्वज फडकाविण्याचा मान आपल्याला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असली तरी हा मान सहजासहजी कुणाला मिळत नाही. मात्र खापा शहरातील नगर परिषद द्वारा संचालित पी एम श्री राजेंद्र हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य राष्ट्रध्वज ध्वजारोहणाचा मान दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांला देऊन एक नवा पायंडा रचला. माजी नगरसेविका हिराताई ज्ञानेश्वर आष्टनकर यांनी 2017 मध्ये शिक्षण सभापती असताना पुढाकार घेत आपल्या अधिकाराचा त्याग करीत ईयत्ता 10 मध्ये प्रथम आलेल्या कुमारी उन्नती श्रीकांत बारापात्रे हिला दिलेला होता. यातून गावातील इतर विद्यार्थ्यांना व युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून ही एक नवी सुरुवात केली होती.

प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर, शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ किंवा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशिष्ट पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना ध्वजारोहण, झेंडावंदन करण्याचा मान मिळतो. यामुळे प्रत्येकाला राष्ट्रध्वज ध्वजारोहण, फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. एकीकडे छोट्या-मोठ्या अधिकारासाठी भांडणे होतात. राजकीय कुरघोड्या व गटातटाचे राजकारण करून पाय खेचण्याचे प्रकार नेहमीच घडतात.

मात्र हे सर्व बाजूला सारून माजी शिक्षण सभापती आष्टनकर यांनी पुढाकार घेत गावातील ईयत्ता 10 मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी उन्नती श्रीकांत बारापात्रे हिला ध्वजारोहण करण्याचा मान दिलेला होता. यातून यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते.

जीवनात यश संपादन करावे या उदात्त हेतूने उन्नतीच्या हातून पी एम श्री राजेंद्र हायस्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले होते. हा उपक्रम असाच अविरत सुरु असावा आणि यावर्षी शाळेतून वर्ग दहा मधून प्रथम आलेल्या जय ऋषीकेशजी बावनकुळे या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावा म्हणून माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती हिराताई आष्टनकर, निखिल आष्टनकर यांनी शाळेचे मुख्याध्यापक सुनील नेहारे यांना निवेदनाद्वारे विनंती केली

Popular Articles