खापा, ११ : खापा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गडेगाव दुधबर्डी शिवार दुधबर्डी परीसरात (दिं. 7ऑगस्ट गुरुवार) च्या सकाळी 9.30 वाजता दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खापा पोलीसांनी सापळा रचून दुधबर्डी शिवारात मोहफुलाची अवैध दारू ची वाहतूक करणाऱे वाहन पकडून कारवाई केली.
खापा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीवरून ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात खापा येथून पाच किलोमीटर अंतरावरील असलेल्या गडेगाव लगतच्या दुधबर्डी शिवारात ही कारवाई केली गेली. या कारवाईत घटनास्थळावरून दारू वाहतूकीस वापरलेली विना नंबर वाहन टी व्हि एस ज्युपिटर मोपेड किंमत ₹90000/-, तीन प्लास्टिक पन्नित मोहफुल हातभट्टी दारू एकूण 30 लिटर किंमत ₹3000/- असा एकूण 93000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी दिनेश दिलीप राजपूत (वय 29 वर्ष) रा. तिडंगी पो. नांदा गोमुख, ता. कळमेश्वर जि. नागपूर याला अटक करण्यात आली. कलम 65 (अ), (ई) महा. दा. का अन्वये आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही खापा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण बोरकर, पोलीस शिपाई परवेज शेख, पोलीस शिपाई राहुल रेवतकर यांनी ही यशस्वी कारवाई केली




