सचिन चौरसिया, रामटेक ११ : कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँण्ड साइंस (किटस) रामटेक इथे २० क्लब, असोसिएशन व फोरमचा उद्घाटन समारंभ किट्सच्या सिल्वर जुबली हॉल मध्ये शनिवार (दि. ०८) lऑगस्ट ला संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मुख्यवक्ते डॉ. चंद्रहास हांडा यांचे हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डीन. डॉ. पंकज आष्टणकर, आयक्यूएसी डीन डॉ. यशवंत जीभकाटे, विविध् विभागाचे विभाग प्रमुख, प्राधापक सहित विविध फोरम व असोसिएशनचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. चंद्रहास हांडा मार्गदर्शनपर म्हणाले की विविध फोरमच्या माध्यमातून विद्यार्थांचा व्यक्तिमत्व विकास होतो. जिवनाची खरी सुरुवात पुस्तका बाहेरची आहे. लोकमान्य टिळक म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच. त्याप्रमाणे मी मोठा होणारच असा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करावा. पंतप्रधानाचे स्वप्न आहे. युवक देशाचे भवितव्य आहे. भारत जगात सर्वात तरुण देश आहे. भारत देश जगात बुद्धिमता मध्ये अग्रेसर असेल. जगात स्कील्ड यूवकांची मागणी आहे व ती मागणी भारत पूर्ण करेल. अभ्यासामध्ये विद्यार्थांनी ४ वर्षे म्हणजे बाराशे तास भरपूर मेहनत करावी. यश नक्कीच येईल. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की फोरम व असोसिएसनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. मोठे काम सहजतेने साध्य करता येतात. डीन डॉ. पंकज आष्टणकर यानी विविध फोरम व असोसिएशनच्या कार्यपद्धति विषयी माहिती दिली व म्हणाले की विविध २० फोरम आहेत. यामुळे विद्यार्थांचे कौशल वाढते. संचालन हरवंश कटरे, नूर पठाण, संस्कार मुरली व विश्याखा बेलगे यानी केले. अथितिचा परिचय मोनाली राहंगडाले तर धन्यवाद पल्लवी शेंडे यानी केले..








