spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सचिन चौरसिया, रामटेक ११ :- तालुका हा आदिवासीबहूल क्षेत्र म्हणून ओळखला जातो. रामटेक तालुका व समस्त आदिवासी समाज संघटना यांच्यावतीने जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात शनिवार (दि.०९) ला शांती मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त रामटेक शहरातील पिंपरी पेठ येथून शांती मंगल कार्यालय येथे पारंपरिक आदिवासी वेशभूषेत रॅलीमध्ये सहभागी होऊन आदिवासी बांधवांनी शहर भ्रमंतीत आदिवासी नृत्य करीत सर्व रामटेक नगरवासींचे लक्ष वेधून घेतले होते. मा. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विचारमंथन करत आदिवासी समाजातील बांधवांमध्ये समाज प्रबोधन केले. ते म्हणाले आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. जाहीर झालेल्या राणी दुर्गावती सन्मान योजनेमध्ये महिलांच्या हितासाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी मी करेल. आदिवासी महिलांसाठी नवीन धोरण जाहीर झालेले आहे. व उपस्थित सर्व आदिवासी बहिणीला मनापासून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सतिश पेंदाम, विवेक तुरक, चंद्रकांत कोडवते, नितीन गेडाम, रामचंद्र अडामे किरण टेकाम, रवी धुर्वे, अमिरदास परतेती, अनिल सलामे, सदानंद गाते, संदीप मडावी, निलेश भलावी, विलास उइके, प्रदीप कोडवते, अजय धुर्वे, कन्हैय्या पंधराम, अनिल राउतेल सह रामटेक तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते..

Popular Articles