यवतमाळ :- समाज कल्याण कार्यालयमार्फत शासकीय निवासी शाळा नेर येथे “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे अधिकारी हुडेकर यांनी मार्गदर्शन केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सेवा संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निवासी शाळा नेर येथे सेवा माझे योगदान उपक्रम, पोषण व एनिमिया जनजागृती कार्यक्रमासह तालुक्यातील चोरंबा येथील शाळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी अधिकारी व कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.





