यवतमाळ :- सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार दिवंगत केशव सिताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.





