spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्या उपस्थितीत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ

– पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत कार्यक्रम

यवतमाळ :- यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत मनपूर ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्या उपस्थितीत सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) जालींदर आभाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, गटविकास अधिकारी पद्माकर मडावी उपस्थित होते.

या अभियानाअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप, जन्म व मूत्यू प्रमाणपत्र वाटप, दिव्यांगाना धनादेश वाटप, विकसित भारत राष्ट्रीय आजीविका मिशन अंतर्गत जॉब कार्ड वाटप, स्तनदा माता यांना किट वाटप व शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांनी आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य तपासणी कॅम्प व महिला बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावातील महिला-पुरुष व विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.