हंसराज,भंडारा तुमसर :- सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तुमसर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या आवारात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार व पोलीस पाटलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून २३ जणांनी रक्तदान केले.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजातील गरजू व गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे नियोजन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराची सुरुवात तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी स्वतः रक्तदान करून केली.
यामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस उपनिरीक्षक प्राची सपकाळ, श्रेणी पोउपनी मनोहर शहारे, पोलीस हवालदार प्रफुल कठाणे, भुमेश्वर पटले, नरेंद्र टेकाडे,पोलीस शिपाई अमोल वाघ, अमोल आदमने, प्रमोद कांबळी, विजय दमाहे, चेतन कुरंजेकर, शैलेश रतनपुरे, सतीश सपकाळ, निखील हिंगे, तुषार कांबळे, निकलेश पिकलमुंडे, देवानंद हलमारे तसेच पोलीस पाटील उपासराव तितीरमारे, बंटी ईखार, शुभम लांजेवार आणि सैनिक उमाशंकर पंचबुधे आदी २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.





