spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अपघातात गंभीर जखमी तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू ०८ आँगस्टचा अपघात तर ०९ आँगस्टला मृत्यु

 

सचिन चौरसिया, रामटेक ११ :- मनसर रामटेक मार्गांवरील मानूभाव आश्रम समोर अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने (एमएच ३६-१८८९) रस्ता ओलांडणाऱ्या तरुणांला जोरदार धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी असता शनिवार (दि. ०९) सकाळी ९.३० वाजता शासकीय मेडिकल रुग्णालय नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केशव सीताराम कोडापे (वय ३२, रा. योगीराज रुग्णालय, झोपडपट्टी रामटेक) असे या मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक केशव सीताराम कोळापे (वय ३२) हल्ली मुक्काम रामटेक झोपडपट्टी येथील युवक मनसर येथील मानूभाव पंथ आश्रम परिसरात आला होता. शुक्रवारी (दि. ०८) दुपारी ४.३० च्या सुमारास रस्ता ओलांडतांना दरम्यान मनसरकडून रामटेकच्या दिशेने रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या धडकेत केशवच्या डाव्या हातावरून टिप्पर चे चाक गेल्याने त्याचा डावा हात पूर्णपणे निकामी झाला. या घटनेची माहिती तात्काळ ओरिएंटल टोल प्लाजा डॉक्टर गजभिये यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता घेऊन गेले. प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला पुढील उपचाराकरिता शासकीय मेडिकल रुग्णालय नागपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र शनिवार ला उपचारदरम्यान केशव यांचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचे रास्ता रोको

दरवेळी होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी बसून रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. परिस्थिती लक्षात घेता रामटेक पोलीसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आंदोलकांनी होती. घटनास्थळी रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित झाले व त्यांनी सर्व आंदोलकांच्या मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळेनंतर दोन्ही मार्ग मोकळे करण्यात आले

Popular Articles