किशोर साहू, मौदा :- भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत आशीर्वादाचा दिवा हा प्रेरणादायी कार्यक्रम कोदामेंढी येथे दीप प्रज्वलित करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे उपसरपंच गोपाल गिरमेकर, उषा भगवान बावनकुळे,शाखाध्यक्ष रघुनाथ मांदाळे, दीपक बावनकुळे सह भाजपा व भाजयूमो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





